नाट्य संमेलन फेब्रुवारीत नागपूरला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

मुंबई - आगामी 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूर येथे 22 ते 25 फेब्रुवारी 2019 या काळात होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गुरुवारी ही माहिती दिली.

मुंबई - आगामी 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूर येथे 22 ते 25 फेब्रुवारी 2019 या काळात होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गुरुवारी ही माहिती दिली.

संमेलनासाठी नागपूर, लातूर, पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणे स्पर्धेत होती. त्यापैकी नागपूरवर नाट्य परिषदेने शिक्कामोर्तब केले. पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलन होणार, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती, परंतु अखेर नागपूरने बाजी मारली. तब्बल 33 वर्षांनी या शहराला नाट्य संमेलनाचा मान मिळाला आहे. यापूर्वी तीन नाट्य संमेलने नागपूर येथे झाली होती. यंदाच्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी भूषवणार आहेत.

नागपूरमधील नाट्य संमेलने
वर्ष          अध्यक्ष

1939 त्र्यं. सी. कारखानीस
1962 शं. नी. चाफेकर
1985 प्रभाकर पणशीकर

Web Title: Natya Sammelan in nagpur