नवी मुंबईत रिक्षा चालकांकडून बस चालक व वाहकाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना खाली बोलवत शिवीगाळ केली. दोन रिक्षा चालकांनी तर बस ड्रायव्हरला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे.

नवी मुंबई - नवी मुंबईतील घणसोलीमध्ये तीन रिक्षा चालकांनी एनएमएमटीच्या चालक आणि वाहकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

घणसोली सेक्टर 5 मध्ये हावरे चौकात हा प्रकार घडला आहे. रस्त्यावर रिक्षा उभ्या केल्या असल्याने बस जाण्यास अडचण निर्माण झाली होती. यामुळे एनएमएमटीच्या बस ड्रायव्हरने हॉर्न वाजवून रिक्षा बाजूला घेण्याची विनंती केली होती. मात्र, यानंतर रिक्षा चालकांनी बस ड्रायव्हर बरोबर हुज्जत घालायला सुरवात केली.

बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना खाली बोलवत शिवीगाळ केली. दोन रिक्षा चालकांनी तर बस ड्रायव्हरला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. मारहाण करणारे रिक्षाचालक हे घणसोलीचे आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शिवराजसिंह चौहानांचे उपोषण सुरु; शेतकऱ्यांशी चर्चेस तयार
धुळे: पावसामुळे तामसवाडीजवळ रस्ता गेला वाहून
पुणे: मोदी फेस्टच्या कार्यक्रमाला खासदार, आमदारांची दांडी
लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
ब्रिटनमध्ये त्रिशंकू स्थिती​

'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार
जिगरबाज बांगलादेशचा न्यूझीलंडवर विजय

Web Title: Navi Mumbai auto driver beaten bus driver and conductor