पश्‍चिम महाराष्ट्राच्या पाठीशी नवी मुंबई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राज्याच्या इतर भागात पूर परिस्थितीमुळे लाखो नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या पाऊस काहीसा थांबल्याने पूर ओसरत असून, आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साफसफाई करणे; तसेच अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेतर्फे सफाई कर्मचारी व साधनसामग्री कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पाठविण्यात आली आहे. 

नवी मुंबई ः अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राज्याच्या इतर भागात पूर परिस्थितीमुळे लाखो नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या पाऊस काहीसा थांबल्याने पूर ओसरत असून, आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साफसफाई करणे; तसेच अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेतर्फे सफाई कर्मचारी व साधनसामग्री कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पाठविण्यात आली आहे. 

त्यानुसार महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधित विभागप्रमुखांची बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी असूनही तातडीने बैठक घेऊन पालिकेचे मदत पथक तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले. कार्यकारी अभियंता संजय देसाई यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधा पथक, स्वच्छता सुविधा पथक; तसेच वाहन सुविधा पथक अशी ३ पथके तयार केली. आरोग्य पथकामध्ये ७ डॉक्‍टर्स, ७ पुरुष स्टाफ नर्स, २ फार्मासिस्ट; तसेच २ कक्ष सेवकांचा समावेश आहे. या पथकात धुरीकरण मशीन्ससह धुरीकरण करणारे २ कंत्राटी कामगार पाठविले जाणार आहेत. तसेच वाहनचालकासह दोन रुग्णवाहिका रवाना होणार आहेत. 

स्वच्छता पथकामध्ये स्वच्छता अधिकाऱ्यांसह २ स्वच्छता निरीक्षक आणि ५० कंत्राटी सफाई कामगार मदतकार्यामध्ये सेवा पुरविणार आहेत. या पथकांसोबत प्रामुख्याने प्रथमोपचार साहित्याचे संच; याशिवाय पूरपरिस्थितीनंतरचा संभाव्य धोका लक्षात घेऊन लेप्टोस्पायरोसीस प्रतिबंधात्मक औषधे, सर्पदंशावरील उपचारात्मक औषधे, धुरीकरण उपकरणे, २ रुग्णवाहिका व २ एनएमएमटी बसेस असणार आहेत. 

पालिकेचे पथक लवकरच रवाना होणार
आरोग्य पथक, स्वच्छता पथक; तसेच वाहन पथक अशी ३ पथके पालिकेने तयार केली आहेत. आरोग्य पथकामध्ये ७ डॉक्‍टर्स, ७ पुरुष स्टाफ नर्स, २ फार्मासिस्ट; तसेच २ कक्ष सेवकांचा समावेश आहे. स्वच्छता पथकामध्ये स्वच्छता अधिकाऱ्यांसह २ स्वच्छता निरीक्षक आणि ५० सफाई कामगार मदतकार्यामध्ये सेवा पुरविणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai on the back of western Maharashtra