Navi Mumbai: उलवे परिसरात राहून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सोमवारी (ता. २८) दुपारी अटक केली. जॉर्ज ओकान्टे डासिल्व्हा (३५) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून तब्बल एक कोटी दोन लाख ५० हजार किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले. नायजेरियन नागरिकाविरोधात यापूर्वीही मुंबईतील नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
उलवे सेक्टर-२५ ए मधील आर. एन. हाइट्स इमारतीमध्ये राहणारा एक आफ्रिकन नागरिक अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती.