नवी मुंबईतील पाच तर मुंबईतील दोन शाळांची मान्यता होणार रद्द ?

शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पाठवला प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे प्रस्ताव
School
Schoolsakal media

मुंबई : कोरोना काळात ( Corona period) वाटेल त्याप्रमाणे मनमानी शुल्क वसूल करणाऱ्या, आणि त्यासाठी पालकांना शुल्काचा तगादा (School Fees) लावत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन (Online Education) शिक्षण बंद करणाऱ्या नवी मुंबईतील (Navi Mumbai) पाच आणि मुंबईतील (Mumbai) दोन शाळांची मान्यता (नाहरकत प्रमाणपत्र) तात्काळ रद्द करा अशी मागणी करणारा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पुण्यातील (Pune) प्राथमिक शिक्षण संचालनालयाला पाठवला आहे. त्यामुळे मनमानी शुल्क वसूल करणाऱ्या या शाळांवर मान्यता काढून घेण्याची कारवाई (Permission cancelled) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Navi Mumbai five and Mumbai two school permissions may be cancelled for getting school fees in corona)

मान्यता काढून घेण्याची कारवाई होणार असलेल्या शाळांमध्ये नवी मुंबईतील नेरूळ येथील अमृता विद्यालय, ऐरोली येथील न्यु हॉरायझन पब्लिक स्कूल, सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूल, वाशी येथील सेंट लॉरेन्स स्कूल आणि कोपरखैरणे येथील तेरणा ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या शाळांचा समावेश आहे. तर मुंबतील बिल्लाबाँग इंटरनॅशनल स्कूल, मालाड, मुंबई आणि बिल्लाबाँग इंटरनॅशनल स्कूल, सांताक्रुझ, या या शाळांचा समावेश आहे.

School
डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबई- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होणार पूर्ण : PWD

कोरोना कालावधीत सर्वत्र ऑनलाइन शिक्षण असतानाही फी वाढ करणे, पालकांकडे फी भरण्यास तगादा लावणे, फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना निकालपत्र न दाखवणे, विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढ़ती न देणे, विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणे तसेच फी न भरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून कमी करणे, आदी आक्षेप या शाळांवर ठेवून त्यांच्यावर मान्यता काढून घेण्याची कारवाई केली जावी, असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

मनमानी करणाऱ्या शाळांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 च्या कलम 16व 17 चे उल्लंघन केलेले असल्यामुळे आणि शासनाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे या शाळांवर कारवाई केली जावी अशी शिफारस मुंबई, नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने आणि त्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे केली आहे.

School
सहा हजार शिक्षकांची रिक्त पदे भरणार; वर्षा गायकवाड यांची माहिती

दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून विश्वज्योत हायस्कूल, खारघर, या शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक), रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडून शिफारशींसह प्रस्ताव शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे.

त्यासोबत बृहन्मंबई महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन केलेले नसल्याने बिल्लाबाँग इंटरनॅशनल स्कूल, मालाड, मुंबई आणि बिल्लाबाँग इंटरनॅशनल स्कूल, सांताक्रुझ, मुंबई या इतर मंडळाशी संलग्न असलेल्या दोन्ही शाळांचे मान्यता, ना-हरकत प्रमाणपत्र करण्याबाबतचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, मुंबई यांच्याकडून शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडे सादर करण्यात आलेले असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com