नवी मुंबईला पुराचा धोका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

तुर्भे - नवी मुंबईतील तुर्भे, इंदिरानगर व एमआयडीसीतील प्रमुख नाल्यांची महापालिकेने साफसफाई केली नसल्यामुळे पावसाळ्यात या परिसराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. 

तुर्भे - नवी मुंबईतील तुर्भे, इंदिरानगर व एमआयडीसीतील प्रमुख नाल्यांची महापालिकेने साफसफाई केली नसल्यामुळे पावसाळ्यात या परिसराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. 

तुर्भे, इंदिरानगर आणि बोनसरीतील नाल्यांची पाहणी राजकीय नेत्यांनी अद्याप केलेली नाही. तर इंदिरानगर व बोनसरी येथील नाल्याची स्वच्छता केलेली नाही. नाल्याच्या काठावर झोपड्या आहेत. पावसाळ्यात या नाल्याला पूर येतो. त्यात अनेक नागरिक व मुले वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या मुख्य नाल्याला जोडणाऱ्या छोट्या नाल्यांकडेही पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा संपला आणि पावसाळा तोंडावर आला असतानाही पालिकेने नालेसफाईचे काम सुरू केलेले नाही. या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचला असून त्यात गवत आणि झुडपे उगवली आहेत. या नाल्यांभोवती संरक्षक भिंत नसल्याने परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते.

महापालिका नालेसफाईचे काम मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हाती घेते; परंतु या वेळी हे काम हाती घेतलेले नाही.

Web Title: Navi Mumbai flood risk