नवी मुंबईः रेल्वे रुळावरुन जाणाऱ्यांना मारहाण करुन लुटणारी टोळी जेरबंद

नवी मुंबईः रेल्वे रुळावरुन जाणाऱ्यांना मारहाण करुन लुटणारी टोळी जेरबंद

मुंबईः गोवंडी ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावरुन चालत जाणाऱ्या दोघांना मारहाण करुन त्यांच्या जवळचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम लुटणाऱ्या चौकडीचा वाशी रेल्वे पोलिसांनी शोध घेऊन त्यांना मानखुर्द भागातून अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात लुटलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

या घटनेतील तक्रारदार सुमितकुमार हरीराम निराला हा गेल्या 4 डिसेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या मेव्हण्यासह रेल्वे रुळावरुन पायी चालत आपल्या घराच्या दिशेने जात होता. याचवेळी त्याठिकाणी आलेल्या अविराज सुरेश कसबे (18), प्रकाश परमशिवम कल्वण (18), गौतम धनंजय पेरीस्वामी (18) आणि अर्जुन मूर्ती हरिजन (18) या चौघा तरुणांनी सुमितकुमार आणि त्याच्या मेव्हण्यांसोबत धक्का दिल्याचा बनाव रचून भांडणाचे नाटक केलं. त्यात आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर या चौघा तरुणांनी सुमितकुमार आणि त्याच्या मेव्हण्याचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम लुटून त्याठिकाणावरुन पलायन केले होते. या घटनेनंतर वाशी रेल्वे पोलिसांनी आरोपी विरोधात मारहाण करुन जबरी लूट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या गुह्यातील आरोपींचा शोध सुरु केला होता. 

या गुन्ह्यातील आरोपीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसताना, वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू केसरकर, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस हवालदार खोतकर, पोलिस शिपाई दराडे, मनवर, हांडे, फुंदे, सरगर, सय्यदआणि मैदाड आदींच्या पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूला सदर घटनेबाबत तसेच आरोपीबाबत चौकशी केली. तसेच आरोपींबाबत माहिती मिळवून अविराज कसबे, प्रकाश कल्वण, गौतम पेरीस्वामी आणि अर्जुन हरिजन या चौघांना मानखुर्द भागातुन ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चौघा तरुणांना अटक करुन त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन, पाकीट आणि रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. 

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Navi Mumbai gangn of  four  robbers arrested  beating passers railway tracks

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com