पदपथांवर फेरीवाल्यांचे बस्तान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

नेरूळ - नवी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे शहरातील रिकामे झालेले पदपथ आता पुन्हा फेरीवाल्यांनी व्यापल्यामुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. नेरूळ परिसरातील बहुतेक सर्वच पदपथांवर फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. विशेष म्हणजे महापालिकाही त्यांच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. 

नवी मुंबईत बेलापूर, कोकण भवन, सीबीडी सेक्‍टर 2, सीवूडस्‌ डीएव्ही शाळेसमोरील सेक्‍टर 48, नेरूळ सेक्‍टर 16, शिरवणे परिसर, सीवूडस्‌ रेल्वेस्थानक पूर्व आणि पश्‍चिमसह शहरातील सर्वच पदपथांवर दररोज सकाळ-सायंकाळी फेरीवाल्यांनी ठाण मांडलेले असते. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील मार्जिनल स्पेस व फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली होती. त्यामुळे पदपथ नागरिकांसाठी मोकळे झाले होते. काही दिवसांपासून प्लास्टिकच्या वस्तू, फळे, भाजीपाला आदी विक्रेत्यांनी पदपथांवर ठाण मांडले आहे. त्यामुळे कोणत्याही रेल्वेस्थानकाजवळच्या रस्त्यावरील एकही पदपथ रिकामा दिसत नाही. 

शहरात आठ विभाग कार्यालये आहेत. आठ विभाग अधिकारी, अतिक्रमण उपायुक्त यांच्या प्रयत्नाने शहरातील पदपथ नागरिकांना किमान चालण्यासाठी रिकामे असले पाहिजेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. शहरात परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या फक्त दोन हजार 160 आहे. बेकायदा फेरीवाल्यांची संख्या त्यांच्या कितीतरी पट अधिक आहे. 

शहरात पुन्हा फेरीवाल्यांनी पदपथ व्यापले असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई होणारच. पदपथ नागरिकांसाठी आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल. 

-अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त. 

Web Title: Navi Mumbai inconvenience pedestrians