नवी मुंबई : ऐरोलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई | Navi Mumbai Municipal corporation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navi mumbai municipal

नवी मुंबई : ऐरोलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई

वाशी : नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai municipal) क्षेत्रात वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामावर (illegal construction) कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांनी दिले आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा: राज्य सरकार विरोधात भाजपचा डोंबिवलीत जनआक्रोश मोर्चा

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ऐरोली सेक्टर ९ येथील दिवागावमध्ये सहदेव अपार्टमेंटजवळ जी प्लस दोनचे बांधकाम करण्यात येते होते. पालिकेची परवागनी न घेता न घेता सुरू असलेल्‍या कामाला नोटीस बजावली होती. त्‍यानुसार संबंधितांकडून अनधिकृत बांधकाम हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी बांधकाम सुरूच ठेवल्‍याने अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तामध्ये कारवाई करत बांधकात निष्कासित केले.

सेक्टर ७ ऐरोली येथील पवन मिल्क सेंटर, पवन सुपर बाजार यांच्या दुकानांबाहेरील मार्जिनल स्पेसमधील जागेत सामान ठेवण्यात आले होते. त्‍यावरही महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. धडक मोहिमेसाठी ५ मजूर, १ गॅस कटर, २ इलेक्ट्रीक हॅमर, पीकअप व्हॅन या साधनांसह जी विभाग ऐरोली येथील अधिकारी व कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होता. पालिकेने केलेल्या कारवाईमुळे बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

"अनधिकृत बांधकामे करण्यात येत असल्यामुळे नोटीस बजावल्यानंतर बांधकाम सुरूच होते. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली. यापुढे देखील बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल."
- महेंद्र संप्ररे, साहायक आयुक्त, ऐरोली

loading image
go to top