नवी मुंबई महापालिकेकडून संजय देसाईंविरुद्ध दोषारोप? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

नवी मुंबई - नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी देसाईंवर ठेवण्यात आलेल्या दोषारोप पत्रावर आयुक्तांच्या स्वाक्षऱ्या झाल्याचे सूत्रांकडून समजते. यात देसाईंवर वेगवेगळ्या प्रकरणातील चार ठपके ठेवण्यात आले असून त्याचे स्पष्टीकरण आल्यानंतर देसाईंची विभागीय चौकशी होण्याची शक्‍यता असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. देसाईंसह अभियांत्रिकी विभागातील इतर बलदंड अधिकारीही आयुक्तांच्या कारवाईच्या रेषेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागात अनेक वर्षांपासून सुखाने नांदत असलेल्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आयुक्त तुकाराम मुंढे यांची वक्रदृष्टी पडली आहे. अतिरिक्त शहर अभियंता, तीन कार्यकारी अभियंता, सहशहर अभियंत्यानंतर आता त्यांच्या रडारवर संजय देसाई आहेत. महापालिकेच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर प्रशासनाने दोषारोप पत्र दाखल केले असून त्यांच्यावर विविध प्रकरणांत चार ठपके ठेवण्यात आले आहेत. पालिकेच्या पायाभूत विकासकामांचे आदेश मिळाल्यानंतरही विलंब करणे, एकाच कामाचे विनापरवानगी तुकडीकरण करून काम करणे, कंत्राटदारांनी केलेल्या कामांची देयके तयार करण्यास उशीर लावणे यासह महापालिका आयुक्तांबद्दल समाजात सोशल मीडियावरून गैरसमज पसरवणे, अशा प्रकारचे ठपके दोषारोप पत्रात ठेवण्यात आले आहेत. 

महापालिकेच्या प्रशासकीय कामांमधील हा एक भाग आहे. महापालिका प्रशासनाने माझ्याविरोधात तयार केलेले दोषारोप पत्र मला अद्याप मिळालेले नाही. ते तयार करण्याआधी "कारणे द्या' नोटीस मला मिळायला हवी होती; परंतु ती मला न देता थेट दोषारोप पत्र बजावले जात आहे. 
- संजय देसाई, कार्यकारी अभियंता 

बलदंड अधिकारी कारवाईच्या परिघात 
नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील बलदंड अधिकारीही आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या परिघात आले आहेत. शहर अभियंता यांनाही एका प्रकरणात नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लवकरच त्यांच्याविरोधातही स्काडा प्रणालीतील अनियमिततेबाबत चौकशी होण्याची चिन्हे आहेत; तर त्यांच्यासह सहशहर अभियंता यांची सुरू असलेली एकसदस्य चौकशी संपली आहे. चौकशीअंती आयुक्तांना सादर केलेल्या अहवालात त्यांच्यावरचे दोष सिद्ध झाल्याने त्यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. 

Web Title: Navi Mumbai Municipal Corporation against the accused, Sanjay Desai