मालमत्ता करवसुलीबाबत प्रश्‍नचिन्ह? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नवी मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या कामानिमित्त नवी मुंबई महापालिकेचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी महिन्याभरापासून बाहेर असल्याने महापालिकेच्या नागरी सुविधा व सेवेवर तसेच उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. आतापर्यंत केवळ पाच कोटी रुपये मालमत्ता कराची वसुली झाली आहे. मागील वर्षीच्या आर्थिक वर्षात एप्रिलमधील हीच वसुली 12 कोटी झाली होती. लोकसभानंतर सहा महिन्यांत येणाऱ्या विधानसभा आणि त्यानंतरच्या सहा महिन्यांत नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे पालिकेच्या 2019-20 च्या मूळ अंदाजपत्रकात नमूद केलेले आर्थिक उद्दिष्ट गाठायचे कसे, असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे. 

सध्या बहुतांशी अधिकारी व कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या उत्पन्न वसुलीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात मालमत्ता करापोटी 12 कोटी रुपये वसूल झाले होते; मात्र चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये आतापर्यंत अवघ्या पाच कोटींचीच करवसुली झाली आहे. निवडणुकीच्या कामकाजामुळे व अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेच्या उत्पन्न वसुलीवर तसेच नागरी सुविधांवर व सेवेवर विपरीत परिणाम झाल्याचे बोलले जाते. 

नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन महिना लोटत आला, तरी महापालिकेच्या मालमत्ता कराची फक्त पाच कोटींची वसुली झाली आहे. सर्वसाधारण सभेने चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करापोटी सुमारे 800 कोटी रुपयांचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे; परंतु सध्या लोकसभा निवडणुकीत व सहा-सहा महिन्यांच्या अवधीत येणाऱ्या विधानसभा आणि महापालिका निवडणूक कामकाजात पालिकेचे अधिकारी व कर्मचारी गुंतणार असल्याने पालिकेचे या वर्षीचे अंदाजपत्रकात नमूद केलेले आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होण्यास अडचण निर्माण होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. 

मालमत्ता करवसुली (रुपये कोटींत) 
वर्षाचे उद्दिष्ट- 800 
एप्रिलमधील आतापर्यंतची वसुली- 5 
एप्रिल 2018 ची वसुली- 12 

Web Title: Navi Mumbai Municipal Corporation has a major impact on the recovery of income