प्लास्टिकमुक्तीकरिता नवी मुंबई पालिकेची धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

प्लास्टिकमुक्त नवी मुंबई ही संकल्पना नजरेसमोर ठेवून प्लास्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी पालिकेकडून करण्यात आले येत आहे. प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी कागदी वा कापडी पिशव्यांचा वापर करण्याबाबत पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन करण्यात येत आहे. 

नवी मुंबई ः प्लास्टिकमुक्त नवी मुंबई ही संकल्पना नजरेसमोर ठेवून प्लास्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी पालिकेकडून करण्यात आले येत आहे. प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी कागदी वा कापडी पिशव्यांचा वापर करण्याबाबत पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन करण्यात येत आहे. 

त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार, परिमंडळ उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार व डॉ. अमरिश पटनिगेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविभ विभागांत धडक मोहिमा राबविण्यात आल्या. प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई करीत ६०० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच पाच हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. त्याचप्रमाणे नेरूळ विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २५० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले. पाच हजार इतका दंड वसूल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal Corporation strikes for plastic relief