नवी मुंबई महापालिका ग्लोबल टेंडर काढणार; 4 लाख लस करणार खरेदी

नवी मुंबई महापालिका ग्लोबल टेंडर काढणार; 4 लाख लस करणार खरेदी

नवी मुंबई : शहरातील लसींचा तुटवडा भरून काढण्यासाठी महापालिका 4 लाख लस खरेदी करणार आहे. त्याकरिता महापालिका जागतिक निविदा (ग्लोबल टेंडर) प्रक्रिया राबवणार आहे. निविदा प्रक्रियेतून लस उपलब्ध झाल्यावर शहरातील लसीकरण सुलभ होईल. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 2 लाख 51 हजार 355 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सध्या लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने लसीकरणाच्या गतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोव्हीडची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यापूर्वी जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कोव्हीड 19 लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर प्रसिध्द करण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी निर्णय घेतला आहे. याकरिता ग्लोबल टेंडर प्रसिध्द करून लवकरात लवकर लस खरेदी करण्याची प्रक्रिया त्वरीत करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिका ग्लोबल टेंडर काढणार; 4 लाख लस करणार खरेदी
पुणे पोलिसांनी पूर्ण केली डॉक्टर दाम्पत्याची 'ती' इच्छा...

नवी मुंबईची लोकसंख्या साधारणत: 15 लाख असून त्यामध्ये 18 वर्षावरील नागरिकांची अंदाजित 10 लाख 80 हजार इतकी लोकसंख्या विचारात घेता आत्तापर्यंत 2.51 लक्ष नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्यातील 58 हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अशा रितीने साधारणत: 8 लाख 29 हजार नागरिकांचे प्रथम डोसचे लसीकरण प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाकडून प्राप्त लसींचा पुरवठा लक्षात घेऊन लवकरात लवकर लसीकरण होण्याच्या दृष्टीने सदर लस खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे. 1 मे 2021 च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोव्हीड लस उत्पादकाने एकूण उत्पादन केलेल्या लसीचा 50 टक्के साठा केंद्र सरकारला दिला जात आहे. उर्वरित लस राज्य सरकार, खाजगी संस्था व कंपन्यांना देण्यात येत आहे. त्यात नवी मुंबई महापालिकेस प्राप्त लस पुरवठा लक्षात घेता नागरिकांच्या लसीकरणात होणारा विलंब या लस खरेदीमुळे टाळला जाईल. अशा सर्व गोष्टींचा विचार करूनच महापालिका सद्यस्थितीत 4 लाख लसीचे डोसेस खरेदी करण्याचे प्रस्तावित केले असून त्याकरिता ग्लोबल टेंडर प्रसिध्द करण्यात येत असल्याची माहिती अभिजित बांगर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com