नवी मुंबई पालिका मुख्यालय प्लास्टिकमुक्त होणार

नवी मुंबई पालिका मुख्यालय प्लास्टिकमुक्त होणार
नवी मुंबई पालिका मुख्यालय प्लास्टिकमुक्त होणार

नवी मुंबई : पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरलेल्या प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्याकरिता आधी स्वतःपासून सुरुवात व्हावी, म्हणून लवकरच नवी मुंबईचा गाडा हाकणारे पालिका मुख्यालय प्लास्टिकमुक्त होणार आहे. 

मुख्यालयात व आवारात कुठेही प्लास्टिकचा वापर केला जाणार नाही. भोजनगृहात विकल्या जाणाऱ्या हवाबंद पाण्याच्या बाटल्यांपासून ते कर्मचाऱ्यांकडून आणल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांवरदेखील बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत स्वतः आयुक्त अण्णासाहेब मिसाळ जातीने लक्ष देणार आहेत. तीन दिवसांच्या रंगीत तालमीनंतर मुख्यालय प्लास्टिकमुक्त घोषित केले जाणार आहे. सकाळ माध्यम समूहाने सर्वात आधी सुरू केलेल्या ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी या मोहिमेला तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनंतर आता मिसाळ यांनी बळकटी दिली आहे. 

प्लास्टिकमुक्तीकरिता सकाळने ‘ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी’ ही मोहीम छेडली होती. त्यानुसार आता मुख्यालयात कामाला येणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना वापरात जास्तीत जास्त प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश मिसाळ यांनी दिले आहेत. तसेच प्लास्टिकबंदीला खिळ लागू नये, याकरिता भोजनगृहात विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात येणाऱ्या हवाबंद प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, ताट, चमच्यांवरही बंदी घातली आहे. तसेच सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांना स्टीलच्या बाटलीत पाणी देण्यास सुरुवात करून प्लास्टिकच्या बाटल्यांना तिलांजली दिली आहे.

महापालिका मुख्यालय प्लास्टिक मुक्त मुख्यालय म्हणून घोषित केले जाणार आहे. सोमवारी संपन्न झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत प्लास्टिकबंदीच्या कठोर अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच ११ सप्टेंबर ते २ ऑक्‍टोबर या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात जास्तीत जास्त प्लास्टिक विरोधी जनजागृतीपर कार्यक्रमांवर भर दिला जाणार आहे. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com