esakal | नवी मुंबई महापालिकेतर्फे महिलांसाठी वस्तुंचे विक्री प्रदर्शन | Navi mumbai municipal
sakal

बोलून बातमी शोधा

navi-mumbai-municipal

नवी मुंबई महापालिकेतर्फे महिलांसाठी वस्तुंचे विक्री प्रदर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महिलांच्या निर्मिती क्षमतेला व ऊर्जेला योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना (schemes), उपक्रमांच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका (navi mumbai municipal) नेहमीच आघाडीवर असते, असे अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले (sujata dhole) यांनी सांगितले. महिलांनी बनविलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीकरिता (material selling) व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित प्रदर्शनप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.

हेही वाचा: राज्यातील कंत्राटी वीज कामगारांचे नोकरीत कायमत्वासाठी आझाद मैदानात धरणे

नवी मुंबई महापालिका बेलापूर विभाग कार्यालयातर्फे सीबीडी बेलापूर येथील वारकरी भवनमध्ये नवरात्रोत्सवाचे औचित्याने महिला स्नेहसंमेलन व महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सनराईज कँडल्स अँड ओशोनी व्हिजन फॉर द ब्लाईंड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भावेश भाटिया, उपक्रमाच्या आयोजक बेलापूर विभागाच्या सहा. आयुक्त डॉ. मिताली संचेती, नागरी आरोग्य केंद्र सीबीडी बेलापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना वाघमारे तसेच माजी नगरसेवक, नगरसेविका आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हजारो दिव्यांगाना मेणबत्ती निर्मिती उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे व्याख्याते डॉ. भावेश भाटिया यांनी शेरोशायरीची पखरण करीत आपले व्यवसायविषयक अनुभव कथन केले. कोणताही व्यवसाय करताना मार्केटिंग महत्त्वाचे असल्याचे सांगत ग्राहकांशी सौजन्यपूर्ण संवाद, वस्तू विक्रीचे कौशल्य याविषयी त्यांनी अनेक महत्त्वाच्या टिप्स महिलांना दिल्या. ८ व ९ ऑक्टोबर अशा या दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे २३ स्टॉल्स आहेत.

रुचकर खाद्यपदार्थांचे स्टॉल, आइस्क्रीम स्टॉल, दिव्यांगांनी निर्माण केलेल्या मेणबत्ती व इतर वस्तुंचा स्टॉल तसेच महिला व मुलांचे कपडे, पिशव्या, पर्सेस, खेळणी व इतर आकर्षक वस्तुंचे स्टॉल्स आहेत. यातील ४ स्टॉल्स महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तुंचे असून इतर स्टॉल्स वैयक्तिक महिलांचे आहेत. कोरोना प्रभावित काळात रोजगार व्यवसायाला आलेली शिथिलता कमी करून महिला बचत गट तसेच दिव्यांगांना एक स्वयंरोजगारासाठी एक खुले व्यासपीठ मिळावे हा प्रयत्न असल्याचे डॉ. मिताली संचेती यांनी सांगितले.

loading image
go to top