esakal | नवी मुंबई: नवरात्रोत्सव साधेपणाने साजरे करा; दांडीया, गरबाला मनाई | Navratri Festival
sakal

बोलून बातमी शोधा

navi mumbai municipal corporation

नवी मुंबई: नवरात्रोत्सव साधेपणाने साजरे करा; दांडीया, गरबाला मनाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कोविड नियमांमध्ये (corona rules) सरकारने शिथिलता (Government) जाहीर केली असली तरी, नवरात्रोत्सव (navratri festival) साधेपणाने साजरा करा असे आवाहन महापालिकेने (navi mumbai municipal) केले आहे. दांडीया आणि गरबा नृत्यावर पूर्णपणे बंदी घातली असून पूजा-आरती करताना पाच लोकांनाच सभामंडपात महापालिकेने परवानगी दिली आहे.

हेही वाचा: गणेशोत्सवासह सण-उत्सव साधेपणाने साजरे करावेत

सलग दुसऱ्या वर्षी तरूणाईचा हिरमोड झाला आहे. घरगुती नवरात्रोत्सव साजरा करताना २ फूट उंचीची मूर्ती आणि सार्वजनिक उत्सवाकरिता ४ फूट उंचीची मूर्ती स्थापना करण्याची अट महापालिकेने घातली आहे. नवरात्रोत्सवादरम्यान गर्दी होऊ नये त्याकरिता महापालिकेतर्फे अधिक खबरदारी घेण्यात येणार आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवादरम्यान रस्त्यावर संध्याकाळपासून सुरु होणारी रेलचेल अगदी रात्री १२ वाजेपर्यंत सुरु असते.

परंतु यंदा गरबा व दांडीया रास यांनाच महापालिकेने मनाई केल्याने या सर्व कार्यक्रमांवर पाणी फेरले आहे. दांडीया व गरबा नसल्याने लाखो रुपये कमावणाऱ्या सार्वजनिक मंडळांवर आर्थिक संकट आले आहे. शहरात मैदानावर व रस्त्यांवर गर्दी होऊ नये म्हणून महापालिकेने चोख बंदोबस्त केला आहे. नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे.

देवीची आरासही साधेपणाने करण्यात यावी. मागील वर्षीप्रमाणे घरातील धातू अथवा संगमरवरच्या देवीची मूर्तीची स्थापना करावी. विसर्जन घरी करावे, अथवा शक्य नसल्यास महापालिकेने व्यवस्था केलेल्या कृत्रिम विसर्जनस्थळांवर विसर्जन करावे. देवीच्या दर्शनासाठी भक्तांना थेट प्रवेश देण्याऐवजी ऑनलाईन पद्धतीने व्यवस्था करावी असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच दसऱ्याची दिवशी रावन दहनाचा कार्यक्रमही नियम पाळून करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

loading image
go to top