पोलिसांची कामगिरी उंचावली!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

कोपरखैरणे - नवी मुंबई पोलिसांची २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये कामगिरी उंचावली असून गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाणही वाढले आहे. २०१६ मध्ये चार हजार ८०१; तर २०१७ मध्ये चार हजार ५६१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातच नव्हे; तर जगात ज्याची चर्चा झाली, अशा वन क्वाईन आणि बॅंकेत भुयार खोदून टाकलेल्या दरोड्याची उकल यशस्वीरीत्या करण्यात आली, अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात वर्षभरात घडलेल्या गुन्ह्यांसंबंधित घडामोडींबाबत आजच्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. या वेळी आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

२०१६ च्या तुलनेने २०१७ हे वर्ष नवी मुंबई पोलिसांसाठी अधिक संघर्षाचे ठरले; मात्र शेवट चांगला झाला. 

अनेक मोठे गुन्हे घडले असल्याने पोलिसांची झोप उडाली होती; मात्र अथक मेहनत करीत त्यांनी या गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले.

गुन्ह्यांमध्ये घट
२०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये गुन्ह्यांत घट झाल्याचा दावा पोलिस आयुक्त नगराळे यांनी केला आहे. ही घट बलात्कार, साखळीचोरी, घरफोडी, मोटार अपघात या मुख्य गुन्ह्यांत झाली. २०१७ मधील ४३ पैकी ४० हत्यांची उकल झाली आहे. मालमत्ताविषयक गुन्ह्यांतील १२,७१,७३,३३३ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: navi mumbai news police