नवी मुंबईकरांना टोलमुक्त करणार

ष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला
ष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला

नवी मुंबई : गेली अनेक वर्षे टोलमुक्ती मिळवण्यासाठी झगडणाऱ्या नवी मुंबईकरांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्याद्वारे टोलमुक्तीचे स्वप्न दाखवले आहे. विधानसभा निवडणुकीकरिता मंगळवारी (ता. १५) राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी जाहीरनामा प्रसिद्ध करत बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक गावडे यांनी वाशी व ऐरोली दोन्ही टोलनाके नवी मुंबईकरांना माफ करणार असल्याचे आश्‍वासन दिले. खारकोपर रेल्वे सेवा उरणपर्यंत विस्तारीत करणे, ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा कळवामार्गे कल्याणपर्यंत विस्तारीत करणे, भुयारी पादचारी मार्ग, बहुमजली पार्किंग अशा प्रकारच्या दळणवळणाच्या सुविधांवर भर देणाऱ्या मुद्द्यांचा गावडे यांच्या जाहीरनाम्यात समावेश केला आहे. 

नाईक कुटुंबीय भाजपवासी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची विस्कटलेली घडी बसवण्यात अवघ्या काही दिवसांमध्येच अशोक गावडे यांना यश आले. नाईकांसोबत गाजलेले नेते भाजपमध्ये गेल्यानंतर एकटे पडलेल्या गावडेंनी जुने व निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज सोबत घेऊन हजारो कार्यकर्ते उभे केले. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीची बेलापूरच्या जागा लढवून पुन्हा भाजपला बलाढ्य आव्हान देण्याचा प्रयत्न गावडेंनी आपल्या जाहीरनाम्याद्वारे केला आहे. 

राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात टोलमाफीचे आश्‍वासन देऊन गावडेंनी नवी मुंबईकरांच्या भावनिक मुद्द्याला हात घातला आहे. चार किलोमीटर अंतरावरील शहरातील नागरिकांना टोल माफीचा नियम असतानाही नवी मुंबईतील वाशी व ऐरोली टोलनाक्‍यापासून जवळच्या नवी मुंबई शहरातील सर्व वाहनचालकांच्या खिशाला रोज टोलमुळे भुर्दंड सोसावा लागत आहे. यासहित ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाण्याकडे धावणाऱ्या रेल्वे कळवामार्गे कल्याणपर्यंत विस्तार करणे, खारकोपर रेल्वे उरणपर्यंत विस्तार करणे, सानपाडा रेल्वेस्थानक भुयारी मार्ग, बहुमजली वाहनतळ, आरटीओ स्थलांतर अशा अनेक दळणवळणाच्या प्रभावी मुद्द्यांचा गावडेंनी जाहीरनाम्यात समावेश केला आहे. 

महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास योजनेअंतर्गत स्वयं रोजगार, महिला बचत गटांना अर्थसहाय्य व महिला वसतिगृहांची उभारणी केली जाणार आहे. झोपडपट्टीतील नागरिकांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवणार, समूह विकास योजनेच्या माध्यमातून गावठाणांचा विकास करणार, सोसायटी सदस्यांना सोसायटी चालवण्यासाठी सोसायटी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणार, कन्व्हेन्स डीड करून देणार असे अनेक महत्वांच्या समस्या सोडवण्याचे आश्‍वासन गावडे यांनी दिले आहेत.

जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे
- टोलमाफी
- दळणवळणाच्या सुविधांवर भर
- झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवणार
- गावठाणांचा विकास करणार
- सोसायटी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणार
- बहुमजली वाहनतळ
- आरटीओ स्थलांतर

नवी मुंबईतील अनेक प्रश्‍न सोडवायचे आहेत. सर्वांना अभिमान वाटेल असा बेलापूर विभागाचा विकास करायचा आहे. गेली अनेक वर्षे नवी मुंबईकरांना टोलमाफी मिळाली नाही; परंतु या वेळी नवी मुंबईकरांची टोलमधून सुटका करण्याचा प्रयत्न करणार आहे.
- अशोक गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस, उमेदवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com