'सीआयएसएफ'च्या स्वच्छता 'रन'मध्ये धावणार नवी मुंबई

run.jpg
run.jpg

मुंबादेवी : पन्नासावे स्वर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या  केंद्रीय औदयोगिक सुरक्षा दलचा (सीआयएसएफ) 'स्वच्छता रन' मेरेथोंन वॉकेथोन नववर्षात 6 जानेवारीला नवी मुंबईतखारेगाव सेंट्रल पार्क येथे सकाळी सहा वाजता प्रारंभ होणार आहे. यात जवळपास 5000 स्पर्धक यात भाग घेतील असे महासंचालक सतीश खंडारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. निलिमा राणी सिंह यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या मेरेथोंन वॉकेथोन ला ईसकाळ, सकाळ आणि साम टीव्ही मिडिया पार्टनर असून आता पासूनच या स्पर्धेची सीआईएसएफ करत आहे. 

अशी होईल स्पर्धा

10 किमी मेरेथोन : हि स्पर्धा 18 वर्षावरील स्पर्धकांना मोठ्या बक्षिसाची असून विजेत्यांकरिता 10 हजार, फर्स्ट रनरअप 8 हजार आणि सेकंड रनरअप 6 हजार अशी बक्षिसांची लयलुट असून 10 किमी मेरेथोंन करिता आहे. तर, 5 किमी मेरेथोंन हि स्पर्धा 12 ते 18 वर्षाच्या स्पर्धकासाठी असून त्यात विजयी स्पर्धकांना अनुक्रमे 8, 6 आणि 4 हजारांचे रोख बक्षीस प्राप्त होण्याची संधी मिळणार आहे.

5 किमी वाकथोन :  हि स्पर्धा खास 35 वर्षे वयोगटासाठी असून विजयी स्पर्धकाना 5, 4 आणि 3 हजार रूपयांची रोख बक्षीसे मिळणार आहेत. तर, दूसरीकडे  बच्चे कंपनीसाठी म्हणजेच वय वर्षे 8 ते 12 वयाच्या स्पर्धकांनाही 5, 4 आणि 3 हजारांची रोख बक्षिसांची लयलुट करण्याची सर्वोत्तम संधी प्राप्त होणार आहे.

या स्पर्धे करिता eSakal.com, साम टीव्ही आणि सकाळ वृत्तपत्र माध्यम मिडिया पार्टनर असल्याने स्पर्धेची उत्सुकता वाढलेली आहे.

कोठे कराल नोंदणी.
या स्पर्धेकरिता स्पर्धकांना प्रवेशनोंदणी मोफत असून

ऑनलाईन : www.cisfmarathon.in
ऑनसाईट : CISF Complex,Sector 35 D,
                Kharghar,Navi Mumbai-410210.
फोन क्रमांक : 022 27762015, 9619161523 येथे संपर्क साधल्यावर करण्यात येईल असे सीआईएसएफच्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com