esakal | नवीमुंबईतील कामगाराचे अपहरण करून उल्हासनगरमध्ये हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

 navi mumbai worker

नवीमुंबईतील कामगाराचे अपहरण करून उल्हासनगरमध्ये हत्या

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर : सोमवारी चिंचपाडा (chinchpada) परिसरात असणाऱ्या गावदेवी तलावात तरंगलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख टॅट्यू वरून पटली आहे. हा मृतदेह नवीमुंबई (navi mumbai) मधील नाका कामगाराचा असून त्याचे अपहरण (kidnapped) करून हत्या केत्याचा (murder) गुन्हा विठ्ठलवाडी (vitthal police station) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: वसईच्या समुद्रातील बोट संशयाच्या भोवऱ्यात; स्थानिक यंत्रणा सतर्क

सोमवारच्या रात्री तलावात एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी पथकासोबत घटनास्थळाकडे धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या शरीरावर टॅट्यू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता.

मयताचे वय अंदाजे 30 ते 35 आणि त्याच्या शरीरावर टॅटू गोंदलेला असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी सर्व पोलिसांना पाठवली होती. ह्या माहितीच्या आधारे हा मृतदेह चंद्रकांत शेलार ह्या नाका कामगाराचा असून तो नवी मुंबई येथील रबाळे येथून हरवला असल्याचे समोर आले. तसेच शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात चंद्रकांतच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराचा वार असल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा अज्ञात इसमांविरोधात दाखल करण्यात आला आहे.चंद्रकांतचे अपहरण करून कुणी व का त्याची हत्या केली याचा उलगडा होणार,आम्ही आरोपींच्या समीप पोहचत असल्याचा विश्वास विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी व्यक्त केला.

loading image
go to top