नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहीन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

भांडुप - नागरिकांच्या सेवेसाठी मी नेहमीच तत्पर असेन. कार्यकर्ता म्हणून काम करताना मी अनेक कामे केली आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष काम केले आहे, असे मुलुंडमधील प्रभाग १०४ च्या मनसेच्या उमेदवार नविता गुंजाळ यांनी सांगितले. गुंजाळ यांनी तीन वर्षांपासून मुलुंड विभागातील मनसेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत अनेक कामे केली आहेत. 

महिलांसाठी शिवणयंत्रावर शिलाई प्रशिक्षण, रिक्षा परवाना, संगणक कोर्सेस, शिवणकाम, घरघंटी अशा माध्यमातून त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. विशेषतः अपंगांसाठीसुद्धा सोयी दिल्या. महिलांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. महिलावर्गाशी नेहमीच जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अंबिकानगर, इंदिरानगर तसेच अलीनगर, सिद्धार्थनगर, विजयनगर हा भाग झोपडपट्टीयुक्त असल्याने येथील गटारसफाई, पाण्याचे प्रश्न सोडवले आहेत. येथील नागरिकांच्या मनात माझ्याबदल प्रेम आणि विश्वास आहे. अंबिकानगरमध्ये एसआरए इमारतींमधील पाण्याचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे. यासाठी मी नक्कीच काम करणार आहे. राज ठाकरे यांच्या सांगण्यानुसार कोणतेही काम नागरिकांना कायमस्वरूपी उपयुक्त असावे, अशा प्रकारचेच कार्य मी या विभागात केले असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांसाठी चांगल्या संधी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्यासाठी बगिचा आणि मैदान, ट्रॅफिक प्रश्नाशी निगडित कामे, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, फूटपाथवर बसणाऱ्या फेरीवाल्यांसाठी कायमस्वरूपी जागा, झाडे लावणे अशा प्रकारची अनेक कामे मी करणार आहे. माझ्यावर लोकांनी असाच विश्वास ठेवावा, मी त्यांच्यासाठी नेहमीच तत्पर राहीन, असे त्या म्हणाल्या.

‘माझी आई राजकाराणात असल्याने मी तिच्याकडूनच प्रेरणा घेऊन राजकारणात प्रवेश केला. मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण मनसेमध्ये सहभागी झालो. मनसेच्या सर्व आंदोलनात मी नेहमीच सहभागी राहिली असून आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच सामाजिक कार्यातही मी स्वतःला झोकून दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: navita gunjal candidate bhandup