नौदल अधिकाऱ्याच्या फसवणुकीप्रकरणी एकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

मुंबई - घराचे प्रलोभन दाखवून नौदलातील अधिकाऱ्याला सुमारे १३ लाखांना फसवल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी मुनेद्र रामटेकेला (४७) अटक केली. तक्रारदार राजीव टंडन हे नौदलात कॅप्टन पदावर कार्यरत आहेत. त्यांना बोरिवलीतील बॅंकेने जप्त केलेला फ्लॅट डीआरटी योजनेंतर्गत कमी किमतीत देण्याच्या नावाखाली ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गेल्या वर्षी गुन्हा दाखल केल्यानंतर मुनेद्र हा बोरिवलीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली.

Web Title: navy officer arrested for fraud case