नौदल अधिकाऱ्याच्या बॅंक खात्यावर डल्ला 

नौदल अधिकाऱ्याच्या बॅंक खात्यावर डल्ला 

मुंबई - नौदल अधिकारी समुद्रात कर्तव्य बजावत असताना सायबर गुन्हेगाराने त्यांच्या खात्यातून तीन लाख रुपये काढल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी आंतरराज्यीय टोळक्‍याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिस अधिक तपास करत आहेत. 

तक्रारदार सर्वेश्‍वर राव (31) मूळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी असून सध्या पश्‍चिम नौदल कमांडमध्ये सब लेफ्टनंट या पदावर कार्यरत आहेत. 21 एप्रिलला तक्रारदार पवई येथे पेट्रोल पंपावर गेले असताना त्यांनी एटीएमद्वारे पैसे भरण्याचा प्रयत्न केला असता व्यवहार होऊ शकला नाही. त्यावेळी त्यांनी नेट बॅंकिंगद्वारे व्यवहार करून रक्कम दिली. या वेळी त्यांच्या एटीएमचा डाटा चोरण्यात आल्याचा त्यांना संशय आहे. 

14 विविध व्यवहारांद्वारे बिहारमधून त्यांच्या खात्यातून ही रक्कम काढण्यात आली. 17 एप्रिल ते 21 एप्रिल या कालावधीत ही रक्कम काढण्यात आली. त्या काळात राव जहाजावर तैनात होते. दुसरे नौदल कर्मचारी नवीनकुमार यांच्याही खात्यातून 22 हजार रुपये काढण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणीही कुलाबा पोलिस तपास करत आहेत. ते कर्तव्य बजावून 7 जूनला किनाऱ्यावर आले असता त्यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यांच्या खात्यातील सर्व रक्कम काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ याप्रकरणी कुलाबा पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी याप्रकरणी तोतयागिरी व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com