नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याला गंडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मुंबई - बॅंकेच्या नावाने आलेल्या ई-मेलवरून तुम्हाला एखादी लिंक आली असेल, तर सावधान! कारण अशा पद्धतीने क्रेडिट अथवा डेबिट कार्डची माहिती मिळवणारी टोळी सक्रिय आहे. या टोळीने कुलाब्यातील एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या क्रेडिट कार्डची माहिती घेऊन ऑनलाइन पोर्टलवरून तीन महागडे मोबाईल खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या टोळीने अशा पद्धतीने देशभरात अनेकांना गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नरेंद्रसिंग ढिल्लोन (49) हे नौदलातील निवृत्त अधिकारी सध्या नेव्ही नगरमध्ये फर्निचर मॅनेजर म्हणून काम करीत आहेत.

मुंबई - बॅंकेच्या नावाने आलेल्या ई-मेलवरून तुम्हाला एखादी लिंक आली असेल, तर सावधान! कारण अशा पद्धतीने क्रेडिट अथवा डेबिट कार्डची माहिती मिळवणारी टोळी सक्रिय आहे. या टोळीने कुलाब्यातील एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या क्रेडिट कार्डची माहिती घेऊन ऑनलाइन पोर्टलवरून तीन महागडे मोबाईल खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या टोळीने अशा पद्धतीने देशभरात अनेकांना गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नरेंद्रसिंग ढिल्लोन (49) हे नौदलातील निवृत्त अधिकारी सध्या नेव्ही नगरमध्ये फर्निचर मॅनेजर म्हणून काम करीत आहेत. त्यांचे एका खासगी बॅंकेत खाते असून, गेल्या वर्षी 16 सप्टेंबरला त्यांच्या ई-मेलवर एक बॅंकेचा संदेश आला होता. 

Web Title: navy retired officer cyber crime