नवाब मलिकांच्या सभेत गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या चेंबूरमधील सभेत अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनीच हा हल्ला केल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केल्याने या घटनेचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे.

"चेंबूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आपल्या सभेत ते बंदूकधारी अचानक घुसले. काहींच्या हातात तलवारीही होत्या. त्या बंदूकधारी लोकांनी मारण्याच्या उद्देशानेच आपल्या दिशेने गोळीबार केला; मात्र, आपण या हल्ल्यातून बचावलो, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

सभेत गोळीबार झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्या पैकी एका तलवारधारी हल्लेखोराला पकडण्यात कार्यकर्त्यांना यश आले असल्याचेही मलिक म्हणाले. या हल्ल्यात काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहितीही मलिक यांनी दिली आहे.

"घडलेल्या प्रकाराबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलणार असून, संजय दिना पाटील यांची पक्षाने हकालपट्टी केली नाही तर कार्यकर्ते सहन करणार नाहीत,'' असेही मलिक म्हणाले. माजी खासदार संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

Web Title: Nawab Malik targeted by gunman in Mumbai; Ex NCP MP Sanjay Dina Patil accused of planning attack