नयनतारा सहगल रविवारी मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

मुंबई - ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचे दिलेले निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. या लज्जास्पद घटनेबद्दल सहगल यांची माफी मागून मराठी जगतात त्यांचे स्वागत करावे, या उद्देशाने मराठी लेखक, कलावंत, वाचक आणि रसिकांतर्फे 29 जानेवारीला सायंकाळी सात वाजता दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये कार्यक्रम होणार आहे. सहगल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने सगळे मिळून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुनरुच्चार करू या, असे आवाहन करण्यात येत आहे.
Web Title: nayantara sahgal in mumbai