NCBकडून रिया चक्रवर्तीला समन्स, अटक होण्याची दाट शक्यता

पूजा विचारे
Sunday, 6 September 2020

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावलं आहे. आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत रियाला हजर राहण्यास सांगितलं आहे. एनसीबीची टीम मुंबई पोलिसांसह कथित आरोपी रियाच्या घरी दाखल झाली आहे.

मुंबईः अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावलं आहे. आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत रियाला हजर राहण्यास सांगितलं आहे. एनसीबीची टीम मुंबई पोलिसांसह कथित आरोपी रियाच्या घरी दाखल झाली आहे. यावेळीच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रियाला समन्स बजावलं आहे. 

रिया सकाळी साडेदहा वाजता एनसीबीच्या कार्यालयात पोहोचण्याची शक्यता आहे. रियाला समन्स बजावत असताना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन पर्याय दिले. यामध्ये रियाला चौकशीत सहभागी होण्याचं आवाहन करत स्वतःहून चौकशीसाठी समोर यावं किंवा दुसरा पर्याय असा की आता आमच्या टीमसोबत चौकशीसाठी यावं. एनसीबीचे सहसंचालक समीर वानखेडे म्हणाले यावर म्हणाले की, रियाला समन्स दिलं आहे. ज्यावेळी आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा ती स्वतः घरी हजर होती.

 

रियाचा भाऊ शौविकला अटक

याआधी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर राहिलेला सॅम्युअल मिरांडा या दोघांना एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. या दोघांनाही किल्ला कोर्टानं 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. तर ड्रग्ज पेडलर कैजानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी असेल.

 

 रियाची, शौविक, सॅम्युअल मिरांडाला समोरासमार बसवून चौकशी होण्याची शक्यता आहे. ड्रग्स कोणी कोणासाठी खरेदी केलं आणि त्यासाठी पैसे कोण देत होते? याचा शोध या चौकशीदरम्यान घेतला जाईल.

NCB Send Rhea Chakraborty summon She will come respecting summon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCB Send Rhea Chakraborty summon She will come respecting summon