esakal | NCB: बड्या राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाची ड्रग्स प्रकरणी चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

NCB

NCB: बड्या राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाची ड्रग्स प्रकरणी चौकशी

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी (Drug peddler) अस्लम आझमीची (Aslam Azmi) शुक्रवारी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) सात चौकशी केली. आझमी यांची पुढील आठवड्यात पुन्हा चौकशी (inquiry) करण्यात येणार आहे. आझमी हा एका बड्या नेत्याच्या (Bib Political Leader) निटकर्तीय आहे. आझमीला ड्रग पेडलर सफ्रान लकडावालाशी संबंधीत असल्याने चौकशीला बोलावले होते. लकडावालाला एनसीबीने 8 जुलैला अटक केली होती. (NCB seven hours inquiry in Drug Connection Aslam Azmi -nss91)

असलम आझमी हा एका बड्या नेत्याचा खास आहे. आझमीला 2018 मध्ये देखील दिल्लीच्या स्पेशल सेलने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. त्याला गोवा एनसीबीने समन्स बजावून मुंबईतील एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आझमी शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी स्वतः त्याची चौकशी केली. सुमारे सात तास ही चौकशी चालली.

हेही वाचा: बोगस लसीकरणाचे आरोपपत्र दाखल करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

एनसीबीने केलेल्या कारवाईत सफ्रान लकडावालाला एनसीबीने अटक केली होती. त्याच्या चौकशीत आझमीचे नाव उघड झाले होते. त्याप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने आझमीला समन्स बजावला होता. त्यानुसार आझमीला 14 जुलैला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पण शुक्रवारी ही चौकशी करण्यात आली. आझमीला पुढील आठवड्यात पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.

loading image