मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीमधील वादळ तूर्तास शमले

राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष
राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष

मुंबई : खाेपाेलीच्या‍ नगराध्यक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली असून त्याची दखल राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खासदार सुनील तटकरे, आमदार सुरेश लाड यांनी घेतली. त्यांनी बुरुज सावरण्यासाठी शनिवारी जोरदार हालचाली सुरू केल्या. त्यानंतर वातावरण शांत झाल्याचे समजते.

खोपोलीतील राजकीय घडामोडींसंदर्भात वरिष्ठ नगरसेवक आणि नगराध्यक्ष सुमन औसरमल यांचे पती मोहन औसरमल यांनी त्यांची भूमिका शुक्रवारी स्पष्ट केली होती. त्यानंतर हे वादळ उठले होते. औसरमल यांच्या मते विरोधी पक्ष म्हणून खोपोलीला राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा निधी मिळत नाही. त्यामुळे शहरातील विकासकामे रखडलेली आहेत. त्यामुळे शहराचा विकास होत असेल, तर नगराध्यक्षासह खोपोलीतील अनेक नगरसेवकांची भाजपात प्रवेश करण्याची तयारी असल्याचा दावा त्यांनी केला होता. 

त्यामुळे खोपोली राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत बुरुज ढासळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याची दखल सुनील तटकरे, सुरेश लाड यांनी घेतली. सध्या तरी राष्ट्रवादीच्या १० पैकी पाच नगरसेवकांनी मोहन औसरमल यांच्या भूमिकेला विरोध करीत राष्ट्रवादीतच कायम राहण्याचा शब्द नेतृत्वाला दिला असल्याची माहिती मिळत आहे. शेकापचे तीनपैकी दोन नगरसेवक पक्ष न सोडण्यावर ठाम आहेत, असे सांगण्यात येते.

खोपोली नगरपालिकेस निधी मिळत नाही, यात काही प्रमाणात तथ्य आहे. गैरसमजातून काही कारणांनी नाराजी असेल, तर ती चर्चा करून दूर करण्यात येणार आहे. खोपोलीतील सर्व नगरसेवक किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबरचे नाते पक्षसंघटनेबरोबरच त्या पलीकडील आहेत. मोहन औसरमल हे अत्यंत परिपक्व नेते आहेत. त्यामुळे पक्षबदल किंवा अन्य वेगळा निर्णय ते घेतील, असे मला वाटत नाही.
- सुरेश लाड, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com