राष्ट्रवादीकडून भाजप सरकारच्या पुतळ्याचे दहन (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेधार्थ भाजप सरकारचा निषेध असो, ईडी झाली येडी, अशी जोरदार घोषणाबाजी करीत ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा पुतळा जाळला.

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेधार्थ भाजप सरकारचा निषेध असो, ईडी झाली येडी, अशी जोरदार घोषणाबाजी करीत ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा पुतळा जाळला. राज्य सहकारी बँकेच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी शरद पवार यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला. याची तीव्र प्रतिक्रिया ठाण्यात उमटली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस- ठामपा गटनेते नजीब मुल्ला,विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी ’ ईडी झाली येडी’ , ’देश का हिटलर कैसा है... नरेंद्र मोदी जैसा है ’, ’नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ’जोर जबरदस्ती के खिलाफ, संघर्ष करेंगे, संघर्ष करेंगे’, ’भाजप सरकारचा निषेध असो’, ’नरेंद्र मोदी हाय हाय, अमित शहा हाय हाय, “फसवणीस” सरकार मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

याप्रसंगी आनंद परांजपे अत्यंत संतप्त शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या;  म्हणाले की, आमचे श्रद्धास्थान असलेले शरद पवार हे आमच्यासाठी देव आहेत. त्यांचा राज्य सहकारी बँकेशी काहीही संबंध नसताना जाणीवपूर्वक राजकीय दृष्टीकोनातून बदनाम करण्यासाठीच ईडीने गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे. शरद पवार यांच्या दौर्‍यांना, सभांना सर्व समाजाकडून, जनतेकडून जोरदार प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. यामुळे राज्य सहकारी बँकेत साधे संचालक नसतानाही ईडीने द्वेषबुद्धीने, सरकारच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला आहे. पण यामुळे कार्यकर्ता पेटून उठला आहे. याचे परिणाम भाजप सरकारला भोगावे लागतील, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला. 

महिला अध्यक्ष सुजाता घाग, नगरसेवक मुंकुद केणी, प्रकाश बर्डे, महेश साळवी, नगरसेविका प्रमिला केणी, अनिता किणे, अंकिता शिंदे, आरती गायकवाड, वर्षा मोरे, माजी नगरसेविका मनाली पाटील, युवक अध्यक्ष मोहसीन शेख, युवती अध्यक्ष प्रियांका सोनार, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावळे,ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापुरकर, सेवादल अध्यक्ष बाळकृष्ण कामत, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष रामदास खोसे, लिगल सेल अध्यक्ष अँड. विनोद ऊतेकर, असंघटित कामगार सेल अध्यक्ष राजू चापले, शहर कार्यकरिणी सदस्य प्रभाकर सांवत, संदिप जाधव, हेमंत वाणी, शिवा कालुसिंह, रचना वैद्य, अरविंद मोरे, विजय पवार, प्रमोद येरुणकर विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, विजय भामरे, विधानसभा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महेंद्र पवार, विक्रांत घाग, ब्लॉक अध्यक्ष समिर पेढांरे, सलिम पटेल, निलेश कदम, निलेश फडतरे, अजय सकपाळ, दत्तात्रय जाधव, विशाल खामकर, कौस्तुभ धुमाळ, महिला  कार्याध्यक्ष सुरेखा ताई, शशिकला पुजारी, ज्योती निंबरंगी, फुलबानो पटेल, कांता गजमल, अनिता मोटे, माधुरी सोनार, वालिया ताई, वंदना लांडगे, स्मिता पारकर, शुंभागी कोळपकर, खिलारे सुवर्णा, लक्ष्मी पवार, सुजाता गायकवाड, आशा राणे, प्रदेश सरचिटणीस हैदर शेख, विधानसभा अध्यक्ष दिपक पाटील, सुधीर शिरसाठ, राजेश कदम, उपाध्यक्ष संकेत नारणे, श्रीकांत तावरे, महेश भाग्यवंत, यशवंत निंबरगे, रोहन कोळेकर, संदिप वेताळ, जावेद शेख,तसेच मोठ्या संख्येने वार्ड अध्यक्ष, पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP burns BJP government statue