प्रभाग समित्यांवर राष्ट्रवादीची पकड

प्रभाग समित्यांवर राष्ट्रवादीची पकड

शिवसेनेला दोन; तर काँग्रेसला एक 
नवी मुंबई - महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सात प्रभागांमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली. दिघ्यातील ‘ह’ प्रभाग समितीसाठी शिवसेनेतर्फे जगदीश गवते व राष्ट्रवादीतर्फे दीपा गवते या दोघांचे अर्ज आल्यामुळे मतदान घेण्यात आले; मात्र यात दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यामुळे अखेर चिठ्ठी टाकून मतदान घेण्यात आले. यात जगदीश गवते यांच्या नावाची चिठ्ठी उचलल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.  

कोकण विभागाचे अपर आयुक्त राजेंद्र क्षीरसागर यांनी निवडणुकीत पीठासन अधिकाऱ्याचे कामकाज पाहिले. या निवडणुकीत सात जागांवर अध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे तेथे  बिनविरोध निवड झाली. यात ‘अ’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या स्वप्ना गावडे, ‘ब’च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या श्रद्धा गवस, ‘क’ च्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या अंजली वाळुंज, ‘ड’च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उषा भोईर, ‘इ’च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे लिलाधर नाईक, ‘फ’च्या अध्यक्षपदी रंजना सोनवणे, ‘जी’च्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आकाश मढवी यांची निवड झाली. ‘ह’ प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी दीपा गवते व जगदीश गवते यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी उचलून जगदीश गवते यांची निवड झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com