राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी सक्षणा सलगर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी उस्मानाबादच्या जिल्हा परिषद सदस्या कुमारी सक्षणा सिदराम सलगर यांची नियुक्ती झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली.

सक्षणा यांनी इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तेर गावातील एका सामान्य कुटुंबातील असलेल्या सक्षणा सलगर यांच्या कामाची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची 2016 मध्ये राज्याची स्टार प्रचारक म्हणून निवड केली होती. शिवाय त्या पक्षाच्या प्रवक्‍त्या म्हणूनही काम करत आहेत. राष्ट्रवादीच्या युवती संघटनेच्या स्थापनेपासून सक्षणा सलगर या संघटनेमध्ये काम करत आहेत.

Web Title: NCP girl president sakshana salgar politics