राष्ट्रवादी युवकचे "एक बूथ, दहा यूथ'...!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई - 'राज्यभरात युवकांची ताकद उभी राहिली तरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून होऊ शकतो,'' असा विश्‍वास व्यक्‍त करत आगामी तीन महिन्यांत "एक बूथ दहा यूथ' अशी मोहीम राष्ट्रवादी कॉंग्रेसने हाती घेतली आहे. याबाबतची बैठक पक्षाच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी घेतली.

आगामी लोकसभा निवडणुका वर्षभरावर आल्या असताना "राष्ट्रवादी'ने कंबर कसण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी म्हणून युवकांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचा भर जयंत पाटील यांनी दिला आहे. राज्यातील 91 हजार 400 बूथ व दहा सक्रिय युवक कार्यकर्त्यांची मजबूत फळी बांधण्याचा कार्यक्रम देण्यात आला. यासाठी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पुढील आठवड्यात संग्राम कोते पाटील राज्याचा दौरा करून 10 जूनपर्यंत संघटना बांधण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्‍यात युवकांची शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांसाठी पक्षातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित राहावे लागणार आहे. या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना वक्‍ता प्रशिक्षणदेखील देण्यात येणार आहे.

मागील दोन वर्षांपासून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने राज्यभरात विविध विषयांच्या संदर्भात आक्रमक आदोलने, मोर्चे काढले आहेत. युवक राष्ट्रवादीच्या 1900 नवीन शाखा स्थापन केल्या. 27 जिल्हास्तरीय मेळावे घेतले.
- संग्राम कोते पाटील, प्रदेशाध्यक्ष युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस

Web Title: NCP jayant Patil Politics