भाजप भेटीपूर्वी अजित पवारांनी फेसबुक प्रोफाईल फोटो बदलला; आधी होते 'घड्याळ'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

आजही सोशल मीडियावर एका गोष्टीने लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अजित पावर यांचा फेसबुक प्रोफाईल फोटो! त्यांनी यापूर्वी असलेला घड्याळाचा फेसबुक प्रोफाईल फोटो बदलला आहे. आता त्यांनी कोणता फोटो ठेवलाय?

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष संपला असला व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी अनेक छोट्यामोठ्या हालचालींमुळे राजकीय क्षेत्रात एक नवे वळण येत आहे. आजही सोशल मीडियावर एका गोष्टीने लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अजित पावर यांचा फेसबुक प्रोफाईल फोटो! त्यांनी यापूर्वी असलेला घड्याळाचा फेसबुक प्रोफाईल फोटो बदलला आहे. आता त्यांनी कोणता फोटो ठेवलाय?

अजित पवार भेटले भाजप नेत्याला; म्हणतात, 'राजकीय चर्चा नाही'

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधी फेसबुक प्रोफाईल फोटोला राष्ट्रवादीचे चिन्ह 'घड्याळ' ठेवले होते. मागील अनेक महिने त्यांचा हाच प्रोफाईल फोटो होता. काल दुपारी साडेअकराच्या दरम्यान त्यांनी हा प्रोफाईल फोटो बदलला व आता त्यांनी स्वतःचा हासरा व हाताची घडी घातलेला फोटो फेसबुकच्या प्रोफाईलला ठेवला आहे. त्यांनी हा 'घड्याळा'चा फोटो बदलल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. 

चंद्रकांत पाटील यांचं महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज'

मागच्याच शनिवारी अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घोतली होती. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण राजकीय वातावरणच ढवळून निघाले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक मिनतवाऱ्या करून त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणले. त्यानंतर महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करताना उपमुख्यमंत्री पदावर पुन्हा वाद सुरू झाला. तसेच आज सकाळी अजित पवार यांनी फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या प्रतापराव चिखलीकर यांचीही भेट घेतली. ही भेट राजकीय नसल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे पुन्हा एकदा अजित पवार काय पाऊल उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

No photo description available.
यापूर्वीचा डीपी

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Ajit Pawar changes his profile picture on Facebook