बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना वंदन करून भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

टीम ई-सकाळ
Thursday, 28 November 2019

मुंबईतील माझगावच्या मंडईत भाजी विक्री करणारा एक तरुण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वानं प्रभावित झाला आणि त्यानं राजकारणार प्रवेश केला. केवळ प्रवेश केला नाही तर, त्या तरुणानं महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. छगन भुजबळ नावाचा हा तरुण आज, राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा नेता बनला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप, त्याखाली जवळपास दोन वर्षांहून अधिककाळ झालेला कारावास यामुळं भुजबळ कायमच चर्चेच राहिले. पण, प्रत्येक आव्हानाला सामोरा जात हा नेता पुन्हा उभा राहिला. विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपचे आव्हान मोडून काढण्याची कामगिरी त्यांनी केली.

मुंबईतील माझगावच्या मंडईत भाजी विक्री करणारा एक तरुण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वानं प्रभावित झाला आणि त्यानं राजकारणार प्रवेश केला. केवळ प्रवेश केला नाही तर, त्या तरुणानं महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. छगन भुजबळ नावाचा हा तरुण आज, राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा नेता बनला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप, त्याखाली जवळपास दोन वर्षांहून अधिककाळ झालेला कारावास यामुळं भुजबळ कायमच चर्चेच राहिले. पण, प्रत्येक आव्हानाला सामोरा जात हा नेता पुन्हा उभा राहिला. विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपचे आव्हान मोडून काढण्याची कामगिरी त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते असलेले भुजबळ आज, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ  घेतली आहे. 

Image may contain: one or more people and text

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय आहे शिवतीर्थावरचा योगायोग?
बेळगाव सीमा प्रश्नावरील आंदोलनात तात्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ वेषांतर करून बेळगावात गेले होते. त्यांना तेथे कर्नाटक पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर छगन भुजबळ यांचा सत्कार केला होता. त्याच शिवतीर्थावर आज, छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला. त्याचे सुपूत्र उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात भुजबळ यांचा समावेश होत आहे. भुजबळ यांचा हा शिवतीर्थ ते शिवतीर्थ हा प्रवास वेगळा योगायोग दिसत आहे. 

Image may contain: 1 person, eyeglasses, beard, hat and closeup

काय आहे महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम?

अन् अजित पवार खळखळून हसले, वाचा का?

छगन भुजबळ यांचा प्रवास

 • जन्म - 15 ऑक्टोबर 1947 - नाशिक
 • मुंबईत व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्सि्टट्यूटमधून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे पदवीका शिक्षण 
 • शिवसेनेतून राजकारणात सुरुवात 
 • शिवसेना मुंबईत रुजवण्यात मोलाचे योगदान
 • 1973मध्ये मुंबई महापालिकेत पहिल्यांदान नगरसेवक म्हणून निवड 
 • 1973 ते 1984 या काळात महापालिकेत विरोधीपक्षनेता म्हणून काम पाहिले 
 • 1985मध्ये महापौर म्हणून निवड 
 • 1991मध्ये दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर म्हणून निवड 
 • शिवसेना प्रमुखांशी 1991मध्येच मतभेद झाल्यानंतर भुजबळ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला 
 • शिवसेना उमेदवारांसाठी मेहनत घेऊनही मनोहर जोशी यांना विरोधीपक्ष नेते केल्यानं भुजबळ नाराज झाले होते.
 • 1 नोव्हेंबर 1992 रोजी त्यांनी महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. 
 • काँग्रेसमध्ये भुजबळ शरद पवार गटात सामील झाले. 
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून, भुजबळ यांनी काम पाहिले 
 • 1999मध्ये शरद पवार यांच्यासोबत भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. 
 • 1999मध्ये राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली 
 • सरकार मध्ये गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली 
 • 2004 ते 2008 सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी पार पाडली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader chhagan bhujbal political journey profile in marathi