मी, जयंत कुसूम राजाराम पाटील शपथ घेतो की...

टीम ई-सकाळ
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

वडिलांच्या अचानक निधनानंतर अमेरिकेत शिक्षण घेत असलेला तरुण, पुन्हा आपल्या गावी आला. वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे चालवला आणि आज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाचा नेता बनला. जयंत पाटील यांचा हा प्रवास असून, आज, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवतीर्थावर मंत्रिपदाची शपथ घेतली. मी जयंत कुसूम राजाराम पाटील शपथ घेतो की, अशी सुरुवात करत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर, ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील जयंत पाटील उच्चशिक्षित मंत्री असणार आहेत. जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या अर्थ आणि गृहखात्याची धुरा सांभाळली आहे.

वडिलांच्या अचानक निधनानंतर अमेरिकेत शिक्षण घेत असलेला तरुण, पुन्हा आपल्या गावी आला. वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे चालवला आणि आज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाचा नेता बनला. जयंत पाटील यांचा हा प्रवास असून, आज, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवतीर्थावर मंत्रिपदाची शपथ घेतली. मी जयंत कुसूम राजाराम पाटील शपथ घेतो की, अशी सुरुवात करत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर, ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील जयंत पाटील उच्चशिक्षित मंत्री असणार आहेत. जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या अर्थ आणि गृहखात्याची धुरा सांभाळली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा विजय मिळवलेले जयंत पाटील सहकार क्षेत्रातही सक्रीय आहेत. वाळव्यातील राजारामबापू सहकारी साखर कारखाना त्यांच्याच नेतृत्वाखाली यशस्वीरित्या चालत आहे.

Image may contain: 2 people, text

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

जयंत पाटील यांचा प्रवास

  • अमेरिकेत घेतले उच्चशिक्षण, मराठी, हिंदीसह इंग्रजीवर प्रभुत्व
  • सोशल मीडियावर सुरुवातीपासून सक्रीय; जयंत पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांचे सोशल मीडियावर आगमन 
  • 1999 ते 2008 काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये अर्थ खात्याची धुरा सांभाळली 
  • महाराष्ट्राचे सलग नऊ वेळा बजेट सादर करण्याचा विक्रम जयंत पाटील यांच्या नावे 
  • मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे आली गृह खात्याची जबाबदारी
  • जयंत पाटील यांच्या कार्यकाळात मुंबई पोलिसांच्या अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज अशा फोर्स वनची स्थापना 
  • 2009 ते 2014 कार्यकाळात ग्रामविकास खात्याची धुरा सांभाळली, महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक केंद्र सरकारकडून सत्कार
  • राजारामबापू टेक्निकल इन्स्टिट्यूट, कृष्णा  दूध, सहकारी दूध संघ तसेच राजारामबापू टेक्स्टाईल पार्क, राजारामबापू सहकारी बँकाची स्थापना केली 
  • 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असतानाच, पक्षाला 54 जागांवर विजय 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader jayant patil political journey profile in marathi