स्टिकर्स छापायला वेळ लागला; त्यामुळे सरकारच्या मदतीलाही उशीर : जितेंद्र आव्हाड

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

सांगली कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीसाठी उशीर झाल्यामुळे आव्हाड भडकले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज पुन्हा भाजप सरकारवर जहरी टीका केली आहे. 'सरकारला मदत द्यायला उशीर झाला, रागावू नका, स्टीकरच्या डिझाईन प्रिटींगला उशीर लागला म्हणून वाटायला उशीर झाला. आता अंत्यसंस्कार थोडे थांबून करा कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत,' असे ट्विट करत आव्हाड यांनी सरकरावर टीका केली आहे.

सांगली कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीसाठी उशीर झाल्यामुळे आव्हाड भडकले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

 

पूरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूंवर मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह जाहीरातबाजी करण्यात आली आहे. स्टीकर छापण्यासाठी एवढा वेळ मिळतो कसा, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, आता समजले की, राज्य सरकारची मदत ही पाकीटांवर जाहीरात करण्यासाठी थांबली होती, असंही टीकाकारांकडून बोललं जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Jitendra Avhad criticizes BJP Government