खासगी ओएसडींना कर्तव्यातून मुक्त करा : नवाब मलिक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

सर्व खाजगी ओएसडींना त्वरित त्यांच्या कर्तव्यापासून मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी केली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार असल्याने त्यांच्या कार्यकाळात नियुक्त केलेल्या सर्व खासगी ओएसडींना त्वरित त्यांच्या कर्तव्यापासून मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी केली आहे.

या काळजीवाहू सरकारकडे राज्यातील महत्वाच्या फाईल्स असून, त्या फाईल्सची यादी राज्यपाल महोदयांनी तातडीने मागवून घ्यावी कारण परत त्याच मागील तारखांचे आदेश ते काढण्याची शक्यता आहे, अशी भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Nawab Malik demands withdraw personal OSDs for ministers