राजन किणी यांच्या हाती "घड्याळ' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

ठाणे - जुन्या नोटांच्या बदलीच्या वातावरणामुळे सर्वसामान्यांची ससेहोलपट सुरू असतानाच ठाण्यातील राजकारण महापालिकेच्या निवडणुकांसाठी तापू लागले आहे. या तापलेल्या राजकारणात कॉंग्रेसचे गटनेते राजन किणी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची कास धरली आहे. 

ठाणे - जुन्या नोटांच्या बदलीच्या वातावरणामुळे सर्वसामान्यांची ससेहोलपट सुरू असतानाच ठाण्यातील राजकारण महापालिकेच्या निवडणुकांसाठी तापू लागले आहे. या तापलेल्या राजकारणात कॉंग्रेसचे गटनेते राजन किणी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची कास धरली आहे. 

राजन किणे यांच्यासह त्यांची पत्नी अनिता किणी, रेश्‍मा पाटील, माजी नगरसेविका सुनीता सातपुते आणि मुंब्य्राचे कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष रमेश पाटील, मोरेश्वर किणी यांनी मंगळवारी (ता. 15) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे, नजीब मुल्ला उपस्थित होते. 

काही दिवसांपासून थंडावलेले ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. ठाण्याच्या मुख्य शहरातील कॉंग्रेसचे नगरसेवक शिवसेना आणि भाजपने आपल्याकडे खेचल्यानंतर आता कळवा, मुंब्य्रात राष्ट्रवादीने आपला बालेकिल्ला मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंब्य्रातील कॉंग्रेसच्या सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक राष्ट्रवादीने आपल्या पक्षात आणले आहेत. शहरातील शिवसेना व भाजप आपली ताकद वाढविण्यासाठी व्यूहरचना आखत आहे. तर दुसरीकडे, "राष्ट्रवादीने पहिल्या टप्प्यात इतर पक्षातील तीन नगरसेवकांना फोडले आहे. पुढील टप्प्यात इतर पक्षातील आणखी काही पदाधिकारी पक्षात येतील', असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. 

गटनेत्यांचेच आऊटगोईंग! 

ठाण्यात कॉंग्रेसने महापालिकेतील गटनेत्याची जबाबदारी सोपविलेल्या नेत्यांकडूनच पक्ष सोडण्यासाठी पुढाकार घेतला जात असल्याचे विदारक चित्र कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पाहावे लागत आहे. यापूर्वी रवींद्र फाटक यांच्यावर गटनेतेपदाची धुरा होती; परंतु त्यांनी शिवसेनेची कास धरली. त्यानंतर गटनेते संजय घाडीगांवकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता राजन किणी यांनीही गटनेतेपदावर असतानाही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीकडून विविध पक्षातील इनकमिंग सुरू असतानाच कॉंग्रेसला मात्र सध्या आऊटगोईंगने ग्रासले आहे. 

Web Title: NCP leader Rajan Kini treated by Congress