शरद पवारांनी पत्रकार परिषदेत वाचली एक कविता; कोणाची कविता? काय आहे कारण?

टीम ई-सकाळ
Tuesday, 18 February 2020

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी पोलिसांचीच चौकशी करण्यात यावी, असं मत व्यक्त केलंय.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, मुंबईत पत्रकार परिषद घेतली. एल्गार परिषदेच्या चौकशीबाबत प्रामुख्यानं पवार यांनी भाष्य केलं. परिषदेला उपस्थित नसलेल्यांवर तात्कालीन सरकारने गुन्हे दाखल केले आहेत, असं मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले शरद पवार?
एल्गार परिषदेच्या चौकशी वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. यात परिषदेची चौकशी एनआयए मार्फत करण्यासाठी थेट केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. पण, शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी पोलिसांचीच चौकशी करण्यात यावी, असं मत व्यक्त केलंय. एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. एल्गार परिषदेत शंभरावर संघटना होत्या. पण, अनेकजण त्या परिषदेला हजर नसतानाही त्यांच्यावर तात्कालीन सरकारनं गुन्हे दाखल केले. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यामुळं कोरेगाव-भिमाची दंगल झाली, असंही मत पवार यांनी व्यक्त केलं.

No photo description available.

आणखी वाचा - भीमा-कोरेगावचा तपास केंद्राकडे देणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे

कविता कोणाची
पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, 'एल्गार परिषदेत सुधीर ढवळे यांनी नामदेवराव ढसाळांची कविता वाचली होती. त्या कवितेत गैर ते काय? ढसाळांनी उपेक्षित वर्गावर केलेली ही कविता ढवळे यांनी वाचली तर, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.' असे सांगत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत ढसाळांची ती कविता वाचून दाखवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader sharad pawar reads namdevrao dhasal poetry press conference