
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सअप स्टेटस गेल्या दोन दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत. काल त्यांनी कुटुंब आणि पक्ष फुटल्याचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवून, बदललेली राजकीय समीकरणं स्पष्ट केली आहेत.
मुंबई : राज्यातील राजकारणातील नाट्यमय घडामोडींनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आणि काँग्रेस महाआघाडीच्या हालचालीकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आज, मुंबईतील रेनेसाँ हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेतली. त्या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी राष्टवादीच्या नेत्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर हॉटेलमध्ये नेत्यांनी केलेले फोटसेशन सध्या सोशल मीडयावर चर्चेचा विषय ठरत आहे. काल कुटुंब दुभंगल, असं स्टेटस ठेवणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी आज, सत्ता येते जाते नाती महत्त्वाची असतात, असं स्टेटस ठेवलंय.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सअप स्टेटस गेल्या दोन दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत. काल त्यांनी कुटुंब आणि पक्ष फुटल्याचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवून, बदललेली राजकीय समीकरणं स्पष्ट केली आहेत. एका फोटोमध्ये शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नूतन आमदार रोहित पवार यांच्यासोबतचा संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेअर केला असून, तो व्हॉट्सअप स्टेटसवरही ठेवला आहे. सध्या हे फोटो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होताना दिसत आहेत.
अजित पवारांचे खळबळजनक ट्विट
दरम्यान, एका बाजुला शरद पवार, सुप्रिया सुळे राज्यात नव्या समीकरणांची जुळवाजुळव करत असताना, अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच आहोत आणि शरद पवार आपले नेते आहेत, असं ट्विट केलंय. त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.