Video : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाचा पेच कायम; अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे

 NCP legislative party leader selection problem is continued and speaker have all rights says Legislature Secretary Rajendra Bhagwat
NCP legislative party leader selection problem is continued and speaker have all rights says Legislature Secretary Rajendra Bhagwat

मुंबई : 'राष्ट्रवादीचे विधिमंडळ गेटनेते म्हणून जयंत पाटील यांनी विधानसभा सचिवांकडे पत्र दिल आहे. मात्र त्यावर निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो, त्यामुळे ते जो निर्णय घेतील तोच सर्वांना मान्य करावा लागतो.' असे स्पष्टीकरण विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांनी दिले. 

राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या सहीची आमदारांच्या पाठिंब्याची कागदपत्रे आहेत. मात्र. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना गटनेते पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला होता. आता राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील असतील, असे पत्रही पक्षाने विधानसभा सचिवांकडे दिले आहे, मात्र यावर निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार हा सचिवांकडे नाही, यावर फक्त विधानसभा अध्यक्षच निर्णय घेऊ शकतात, असे भागवत यांनी सांगितले. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदी शपथविधी पार पडल्यानंतर त्यांना विधानसभा अधिवेशनात सरकारचे बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने 162 आमदारांचे संख्याबळ असल्याचे पत्र तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे दिले आहे. त्यामुळे साहजिकच भाजपला अतिरिक्‍त कोणते आमदार मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. गेल्या एक महिन्यापासून भाजप नेत्यांनी अन्य पक्षांतील आमदार मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. तरीही, बहुमतासाठी आमदार मिळविण्याचे प्रयत्न भाजपने सोडले नसल्याचे सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com