Jitendra Awhad: स्टेज खचला अन् आमदार जितेंद्र आव्हाड पडता पडता...;Video Viral

कार्यकर्त्यांनी वेळीच सावरले म्हणून जितेंद्र आव्हाड स्टेजवर पडता पडता वाचले
Jitendra Awhad
Jitendra AwhadEsakal

मुंब्रा येथे कार्यक्रमादरम्यान स्टेज खचला अन् राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड पडता पडता वाचले. स्टेजवर उपस्थित असलेल्या कार्यकत्यांनी जितेंद्र आव्हाडांना पकडलं. 4 फेब्रुवारीला रोजी मुंब्रामध्ये आमदार प्रीमियर लीगचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते.

आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड याठिकाणी उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड स्टेजवर आले असता ते स्टेजवरील खुर्चीत बसणार इतक्यात स्टेजचा काही भाग खाली खचला. तर जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना सावरलं त्यामुळे सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र जितेंद्र आव्हाडांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Jitendra Awhad
Ramdas Kadam: 'माझ्या नादाला लागू नका', ठाकरेंच्या सभेनंतर रामदास कदम संतापले

तर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानभवनातून बाहेर पडून पायऱ्या उतरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पडता पडता वाचले. मात्र, त्यांच्यासोबत चालणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना हात देत सावरले. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायऱ्यांवरून पडता पडता वाचले. याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Jitendra Awhad
Farmers Suicide: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये दोन शेतकऱ्यांची आत्महत्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com