आमदार रोहित पवार शेफच्या भूमिकेत, हातगाडीवर बनवली अंडा भुर्जी

पूजा विचारे
Wednesday, 6 January 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी संध्याकाळी नवी मुंबईचा दौरा केला आहे.  या दौरादरम्यान रोहित पवार हातगाडीवर स्वतःहून अंडा भुर्जी करताना दिसले.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी संध्याकाळी नवी मुंबईचा दौरा केला आहे.  या दौरादरम्यान रोहित पवार हातगाडीवर स्वतःहून अंडा भुर्जी करताना दिसले. त्यांनी गाडीवर जाऊन स्वतः अंडा भुर्जी बनवण्याचा आनंद घेतला आहे. रोहित पवारांनी स्वतः ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. 

नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला. यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही.शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. 

मंगळवारी रोहित पवार यांनी नवी मुंबईचा दौरा केला आहे. या दौऱ्यात त्यांनी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी नागरिक, दुकानदार, विक्रेते यांच्यासोबतही संवाद साधला. याबाबतचही त्यांनी ट्विट केलं आहे.

वाशी कृ.उ.बाजार समितीला भेट देण्यापूर्वी नवी मुंबईत अनेक ठिकाणी नागरीक, दुकानदार, विक्रेते यांच्याशी संवाद साधला. यावेळी सर्वांचंच खूप प्रेम मिळालं. त्यांनी आग्रहाने कलींगड, ज्यूस, चहा दिला. काहींनी बाजारातच फेटा बांधून सन्मानही केला. नवी मुंबईकरांच्या या स्वागताने भारावून गेलो, असं ट्वीट त्यांनी केलं.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचीही रोहित पवार यांनी भेट घेतली आहे. बांगर यांच्याशी चर्चा करुन रोहित पवारांनी डेट ऑडिटमुळे मृत्यूजर कमी होण्यास कशी मदत झाली याबाबतची माहिती जाणून घेतली.

Ncp mla rohit pawar new mumbai anda bhurji chef abhijit bangar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ncp mla rohit pawar new mumbai anda bhurji chef abhijit bangar