राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात

या अपघातात जगताप यांच्या बीएमडब्ल्यू गाडीचा चक्काचूर झाला आहे.
Sangram Jagtap Accident
Sangram Jagtap AccidentSakal

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. एसटीने दिलेल्या धडकेमुळे जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचा चक्काचूर झाला आहे. मुंबई पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे. दरम्यान, या अपघातातून जगताप थोडक्यात बचावले आहेत. त्यांना मुंबईकडे नेण्यात आलं आहे.

संग्राम जगताप यांची बीएमडब्ल्यू कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जगताप यांच्या कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

मात्र, संग्राम जगताप या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. ते मुंबईमध्ये सुखरूप पोहोचले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com