NCP आमदारांना पुन्हा दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवणार, मुंबईबाहेर नेणार ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील राजकीय सत्ताबाजाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईतील रेनेसाॅं या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान या हॉटेलचा इतिहास हा भाजपसाठी लकी असाच मानला जातोय. कारण कर्नाटकातील 'ऑपरेशन लोटस' हे देखील याच हॉटेलमध्ये भाजपने यशस्वी करून दाखवलं होतं. अशातच राष्ट्रवादीकडून याच हॉटेलची निवड का करण्यात आली? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.

अशातच आता राष्ट्रवादीच्या आमदारांना रेनेसाॅं या पंचतारांकित हॉटेलमधून दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हॉटेलबाहेर आमदारांसाठी बस उभी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान सर्व  आमदारांची सध्या हॉटेलमधून चेकआउट प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते आहे.  

NCP आमदारांसोबत 'धनंजय मुंडे' नावाचा जळता निखारा, कोण म्हणतंय हे..

आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून या आमदारांना कुठे नेण्यात येणार आहे ? त्यांना मुंबई बाहेर नेण्यात येणार आहे का ? याबद्दल माहिती मिळालेली नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांना ठाण्यात नेण्यात येणार असल्याच्या बातम्या काही मराठी वृत्तवाहिन्यांकडून दाखवण्यात  आल्या.   

Webtitle : NCP MLAs will be reshifted to another hotel says sources 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLAs will be reshifted to another hotel says sources