राष्ट्रवादीची जननी सुरक्षा जागृती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

नवी मुंबई - नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने जननी सुरक्षा आणि हक्क जागृती अभियान गुरुवारपासून (ता. ४) हाती घेण्यात आले. वाशीतील शिवाजी चौकात या अभियानांतर्गत ‘स्त्री-भूणहत्या थांबवा’, या संदर्भातील कायद्याची कडक अंमलबजावणी करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिलांनी केली. 

राज्यात मुलींचा जन्मदर आठ टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. ही राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. यावरून स्त्री-भूणहत्या कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, अशी मागणी महिलांनी केली. यासाठी जिल्हास्तरीय कमिटी स्थापन करणे गरजेचे आहे. नवी मुंबईत ती अधिक सक्षम करण्याची गरज महिलांनी व्यक्त केली. सोनोग्राफी सेंटरविरोधात धडक मोहीम हाती घेऊन लिंगनिदान रोखण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रमुख माधुरी सुतार यांनी व्यक्त केले. माजी खासदार संजीव नाईक, जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, सभागृहनेते जयवंत सुतार, नगरसेविका सुजाता पाटील, लता मढवी, रूपाली भगत, जयश्री ठाकूर आदी या वेळी उपस्थित होते. स्त्री-भूणहत्या रोखण्याची मागणी या वेळी त्यांनी केली. या संदर्भातील निवेदन महापौर सुधाकर सोनवणे यांना त्यांनी दिले. कोकण आयुक्तांकडेही ही मागणी करणार असल्याचे माधुरी सुतार यांनी सांगितले.

Web Title: NCP Mother's safety awareness