"धन, बल और छल हार गया, विकास और विश्वाश जीता" - नवाब मलिक

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

मुंबई - देशाच्या राजधानीत केजरीवालांचा डंका वाजताना दिसतोय. 'लगे रहो केजरीवाल' म्हणत सलग तिसऱ्यांदा दिल्लीकरांनी केजरीवाल सरकारच्या पारड्यात मतं टाकलीयेत. निवडणुकांच्या निलालावरून आता केजरीवाल सरकार पुन्हा दिल्लीत सत्तेत येणार हे स्पष्ट आहे.

अशात विरोधकांनी आता भाजपवर कडाडून टीका करताना पाहायला मिळतेय. मुंबईतून राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर कडाडून टीका केलीये. सुरवातीचे कल पाहता दिल्लीकरांनी बढाया मरणार्यांचा पराभव केलाय, असं नवाब मलिक म्हणालेत.

मोठी बातमी - त्यांनी अनेकांना वाचवलं, अन् त्यांनाच रुग्णालयात घेतलं नाही!   

मोठी बातमी - आधी डॉक्टर, आता पत्रकार.... कोरोनाबद्दलचे संवेदनशील सत्य चीन लपवतंय? 

दिल्ली निकालावर बोलताना दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशद्रोह्यांना मतदान करू नका असं नागरिकांना सांगितलं होतं. दरम्यान, दिल्ली करांनी भाजपाला देशद्रोही घोषित करून टाकलं आहे', अशी घणाघाती टीका नवाब मलिक केलीये. दरम्यान, धन, बल और छल हार गया, विकास और विश्वाश जीता म्हणजेच या निवडणुकांमध्ये पैसे, बाळाचा वापर, छळाची हार झाली आणि विकास आणि विश्वास जिंकलाय असं देखील नवाब मलिक म्हणालेत.  

मोठी बातमी - महिला चातकासारखी वाट पाहतायेत 'त्यांची'...!

दिल्ली निवडणुकांचे दुपारपर्यंतचे कल पाहता आम आदमी पक्ष ५८ जागा तर भाजपकडे १२ जागा होत्या. दरम्यान आम आदमी पक्षाच्या विजयी घोडदौडीमुळे आम आदमी पक्षाच्या देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. 

ncp national spocksperson nawab malik on delhi assembly election results

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp national spocksperson nawab malik on delhi assembly election results