"भाजप समर्थकांना देशात सात खून माफ आहेत असं मानायचं का ?" मलिकांचा सवाल

सुमित बागुल
Wednesday, 4 November 2020

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय परिघातून अनेक प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत.

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय परिघातून अनेक प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. भारतीय जनता पार्टीकडून अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध सुरु आहे. राज्यभरात भाजपकडून आंदोलनं देखील केली गेली. तर दुरीकडे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते, नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

महत्त्वाची बातमी : देवेंद्र फडणवीस यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, पुढील सात दिवस घरी क्वारंटाईन राहणार

काय म्हणालेत नवाब मलिक : 

ज्याप्रकारे केंद्रातील एक मंत्री एका आत्महत्या प्रकरणातील आरोपीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, त्यावरून देशात भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांना देशात सात खून माफ आहेत असं मानायचं का ? असा खडा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. 

महत्त्वाची बातमी : "आम्हाला न्याय मिळेल हा विश्वास", अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर नाईक कुटुंबीयांची प्रतिक्रिया

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ : 

दरम्यान अर्णब गोवामी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबईत कलम ३५३ अंतर्गत आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलिसांसोबत गैरवर्तन करणे, या आरोपात अर्णब गोवामी यांच्याविरोधात मुंबईतील लोअर परळमधील ना म जोशी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

NCP national spokesperson nawab malik on arnab goswamis arrest and bjp agitation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP national spokesperson nawab malik on arnab goswamis arrest and bjp agitation