NCP आमदारांसोबत 'धनंजय मुंडे' नावाचा जळता निखारा, कोण म्हणतंय हे..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

अजित पवार यांनी आज आपला ट्विटरवरील पद बदलून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असं ठेवलंय. या मागोमाग अजित पवार यांनी एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट करत मी अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत आहे, थोडा धीर ठेवा सगळं नीट होईल असं म्हटलंय. अशातच आता अजित पवार यांच्या ट्विटमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालेलं पाहायला मिळालंय. नक्की अजित पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्याचा केला गेलाय की खरच अजित पवार यांच्यासोबत काही आमदार आहेत याबाबत राजकीय विश्लेषक देखील बुचकळ्यात पडले आहेत. 

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी धनंजय मुंडेंच्या ज्या B 4 बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांना आणून फितवण्यात आलं, त्याच धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत ठेवल्याने इतर आमदारांमध्ये भयाचे वातावरण असल्याची माहिती आता सूत्रांकडून समजतेय. जळता निखाराच राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत असल्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.  

काल  दिवसभर धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते साडेचार वाजता वाय बी चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दाखल झालेत. दरम्यान हॉटेल रेनेसाँ यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार सध्या आहेत. आमदार फुटू नयेत म्हणून राष्ट्रवादीनं आमदारांसाठी हे हॉटेल निवडलंय. पण हे हॉटेल भाजपसाठीही लकी आहे. कारण याच हॉटेलात भाजपनं ऑपरेशन लोटस यशस्वी केलं होतं..

कर्नाटकातलं हे सत्ता नाट्य याच हॉटेलमध्ये घडलं. त्यामुळे हे हॉटेल भाजपसाठी लकी मानलं जातं.  अशात राष्ट्रवादीने इथेच आपले आमदार का ठेवले? हा देखील प्रश्न आता चर्चेत आलाय. 

WebTitle : NCP party workers are concerned about dhanajay munde being with all NCP leaders 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP party workers are concerned about dhanajay munde being with all NCP leaders